While Gautama was staying
in Rajagraha there came five other Parivrajakas who also put
up a hut by the side of
the hut which Gautama had erected for himself.
These five Parivrajakas
were Kaundinya, Ashvajit, Kasyapa, Mahanam and Bhaduka.
they told him that after
he left Kapilavatsu there was a great agitation among the Sakyas against going
to war with the Koliyas.
The envoys on the two
sides met and agreed to appoint a permanent Council of
Arbitration with
authority to settle every dispute regarding the sharing of the waters of the
river Rohini and both
sides to abide by its decision. Thus the threatened war had ended in
peace.
The conflict
between nations is occasional. But the conflict between classes is constant
and perpetual. It is this
which is the root of all sorrow and suffering in the world.
True, I left home
on account of war. But I cannot go back home although the war
between the Sakyas and
Kpliyas has ended. I see now that my problem has become wider.
I have to find a solution
for this problem of social conflict.
He was determined to
examine everything for himself.
Later, He took meditation course from Alarakalam, Udakkam
Ramput, etc.
जब गौतम राजगृह
में कुटी बनाकर ठहरे हुए थे, उसी समय पाँच दुसरे परिव्राजक भी आये और
उन्होने भी उसके पास ही एक कुटी बना ली ।
इन पाँच
परिव्राजको के नाम थे कौण्डिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम तथा
भद्रिक ।
उन्होने उसे
बताया कि उसके चले आने के बाद कोलियों से युद्ध ठानने के विरोध में शाक्यों मे बड़ा आन्दोलन छिडा ।
दोनों ओर दूत आपस
में मिले और दोनों ने तय किया कि एक स्थायी पंचायत की नियुकित की जाय और रोहिणी के जल को लेकर कभी भी यदि कोई झगड़ा हो तो इस पंचायत के सामने ही रखा जाय और पंचायत का निर्णय मान्य किया जाय । इस प्रकार युद्ध का खतरा सदा के लिये शान्त हो गया ।
राष्ट्रों में जो
संघर्ष होता है वह तो कभी-कभी होता है लेकिन वर्गो के बीच में जो संघर्ष होता है
वह स्थायी है और लगातार जारी है । संसार के कष्टों और दु:ख के मूल में यह
वर्ग-संघर्ष ही हैं ।
यह सत्य है कि
मैंने युद्ध के कारण ही गृहत्याग किया था । लेकिन शाक्यो और कोलियों का युद्ध
समाप्त हो जाने पर भी मैं घर वापस नही लौट सकता । मैं देखता हूँ कि मेरी समस्या ने
व्यापक रूप धारण कर लिया है । मुझे उस सामाजिक-संघर्ष की समस्या का हल खोज निकालना
है ।
उसने हर परम्परा
का, हर मत का, स्वयं परीक्षण करने का निश्चय किया ।
उसके बाद
उन्होंने आलारकालाम, उद्दक रामपुत्त, इ. इनके पास ध्यानमार्ग
कि शिक्षा ग्रहण कि ।
गौतम राजगृहात
असताना तेथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्यांनीदेखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली.
हे पाच परिव्राजक
म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि
भद्रिक हे होत.
त्यांनी त्याला
सांगितले की, त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलीयांशी युद्ध
पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली.
दोन्ही बाजूंच्या
दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवादमंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत
झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या
मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूना बंधनकारक ठरविण्यात
आला. याप्रमाणे भेडसावणार्या युद्धाचा शेवट शांततेत झाला.
“राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त असतो; परंतु
वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच
जगातील सर्व दुःख.चे मूळ होय.”
“युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलीय
यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्यापुढील
समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला
शोधून काढले पाहिजे.”
प्रत्येक गोष्ट
स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला.
त्यानंतर त्यांनी
आलारकालाम, उद्दक रामपुत्त,
इ. यांच्याकडे
ध्यानमार्गाचे शिक्षण घेतले.
After this he started the
study of Vairagya Marg with five Parivrajakas in Uruvala.
The austerities and
mortification practised by Gautama were of the severest sort. They
lasted for a long period
of six years.
Yet he had seen no new
light and was no nearer to the solution to the problem of misery in
the world on which his
mind was centred.
"New light cannot be
attained by him who has lost his strength and is wearied with
hunger, thirst and
fatigue with his mind no longer self-possessed through fatigue. "
"True calm and the
self-possession of the mind is properly obtained by the constant
satisfaction of the
body's wants."
Thus ended his trial of
asceticism.
The five ascetics who
were with Gautama became angry with him for having given up the
life of austerity and
self-mortification and in disgust left him.
उसके बाद उरुवेला
में पांच परिव्राजकों के साथ तपश्चर्या का अभ्यास शुरू किया ।
गौतम की
तपश्चर्या और आत्म-पीड़न बड़े ही उग्र रूप का था - इतना उग्र जितना उग्र वह हो सकता
था । यह छ: वर्ष के लम्बे अर्से तक जारी रहा ।
तब भी उसे कोई
नया-प्रकाश नहीं दिखाई दिया था, और संसार में जो
दु:ख की समस्या है और जिस पर उसका मन केन्द्रित था, उस समस्या का कोई हल उसे दिखाई नहीं दिया था ।
“जिसके शरीर का बल
जाता रहा, जो भुख तथा प्यास से
परेशान है जिसका मन थकावट के मारे एकाग्र और शान्त नहीं है - ऐसे आदमी को कभी
नया-ज्ञान प्राप्त नहीं हो सकता ।
“सच्ची शान्ति और
चित्त की एकाग्रता शरीर की आवश्यकताओं की पूर्ति से ही ठीक ठीक प्राप्त हो सकती
हैं ।
इस प्रकार उसकी ‘तपश्चर्या’ का अन्त हुआ ।
जो पांच
परिव्राजक सिद्धार्थ गौतम के साथ थे, वे उससे रुष्ट हो गये । क्योंकि, उसने तपस्वी तथा आत्म-पीड़न के जीवन का परित्याग कर दिया था । वे सिद्धार्थ
गौतम को छोड़ कर चले गये ।
त्यानंतर उरुवेला
येथे पाच परिव्राजक यांच्या बरोबर वैराग्य मार्गाचा अभ्यास चालू केला.
गौतमाने सुरू
केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. अशा
प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते.
तरीही त्याला
नवीन प्रकाश दिसला नव्हता, आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केन्द्रित झाले
होते त्या ऐहिक दु:खाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचतही उलगडा झाला नव्हता.
“ज्याची शक्ती
नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही
त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही.”
“खरी शांती आणि
एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते.”
याप्रमाणे त्याची
वैराग्यमार्गाची कसोटी संपली.
तपश्चर्या आणि
आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी
त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले.
To feed himself during the period of
meditation Gautama had collected enough food to
last him for forty days.
It took Gautama four
weeks of meditation to obtain
enlightenment. He reached
final enlightenment in four stages.
In the first stage he
called forth reason and investigation. His seclusion helped him to attain
it easily.
In the second stage he
added concentration.
In the third stage he
brought to his aid equanimity and mindfulness.
In the fourth and final
stage he added purity to equanimity and equanimity to mindfulness.
Thus with mind
concentrated, purified, spotless, with defilement gone, supple, dexterous,
firm, impassionate, not
forgetting what he is after, Gautama concentrated himself on the
problem of finding an
answer to the question which had troubled him.
On the night of the last
day of the fourth week light dawned upon him. He realised that
there were two problems.
The first problem was that there was suffering in the world and
the second problem was
how to remove this suffering and make mankind happy.
So in the end, after
meditation for four weeks, darkness was dispelled, light arose,
ignorance was dispelled
and knowledge arose. He saw a new way.
This new way means Dhamma
ध्यान करने के
समय के लिये गौतम ने इतना भोजन इकट्टा करके पास रख लिया था कि चालीस दिन तक कमी न
पडे ।
ज्ञान- प्राप्ति
के लिए गौतम को चार सप्ताह एक लगातार ध्यान- मग्न रहना पड़ा । उसे अन्तिम अवस्था तक
पहुंचने के लिए चार सीढियें पार करनी पडी ।
पहली अवस्था
वितर्क और विचार प्रधान थी । एकान्त-वास के कारण वह इसे बड़ी सरलता से प्राप्त कर
सका ।
दूसरी अवस्था में
इसमें एकाग्रता आ शामिल नेई ।
तीसरी अवस्था में
समिचत्तता तथा जागरूकता का समावेश हो गया ।
चौथी और अन्तिम
अवस्था मे समिचत्ता तथा पवित्रता का संयोग हो गया और समिचत्ता तथा जागरूकता का ।
जब उसका चित्त
एकाग्र हो गया था, जब वह पवित्र हो गया था, जब वह निर्दोष बन गया था, जब उसमें तनिक भी कलुष नहीं रह गया था, जब वह सुकोमल हो गया था, जब वह दक्ष हो गया था, जब उसमें दृढ़ता आ गई थी, जब वह सर्वथा राग- रहित हो गया था तथा जब उसकी
नजर एक- मात्र अपने उद्देश्य पर ही थी, तब गौतम ने अपना सारा
ध्यान उस एक समस्या के हल करने में लगाया जो उसे हैरान कर रही थी ।
चौथे सप्ताह के
अन्तिम दिन उसका पथ कुछ प्रकाशित हुआ । उसे स्पष्ट दिखाई दिया कि उसके सामने दो
समस्यायें हैं -- पहली समस्या यही थी कि संसार में दु:ख है और दूसरी समस्या यही थी
कि किस प्रकार इस दु:ख का अन्त किया जाय और मानव- जाति को सुखी बनाया जाय ?"
इस तरह चार
सप्ताह तक लगातार चिन्तन करने रहने के बाद अन्धकार विलीन हुआ प्रकाश प्रकट हुआ, अविद्या का नाश हुआ, ज्ञान अस्तित्व में आया; उसे एक नया-पथ दिखाई दिया ।
इसी नए पथ को
धम्म कहते है ।
चिंतन काळात
उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते.
ज्ञान प्राप्ती
करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चार पायर्यांनी त्याने
संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली.
पहिल्या
पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण याचा उपयोग केला. त्याच्या
एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली.
दुसर्या
पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली.
तिस-या पायरीच्या
वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे साहाय्य घेतले.
चवथ्या व
शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची
अवस्था आणली.
अशा प्रकारे
एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि
वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून
सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केन्द्रीत
केले.
चवथ्या
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून
आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे
सुखी करावे, ही दुसरी समस्या.
याप्रमाणे शेवटी, चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन
प्रकाशाचा उदय झाला; अज्ञान नष्ट होऊन ज्ञान
उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला.
हा नवा मार्ग
म्हणजेच धम्म
Ref : The Buddha and His Dhamma - Dr. B. R. Ambedkar
संदर्भ : बुद्ध और उनका धम्म - डॉ. भि. रा. अम्बेडकर
संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. भि. रा. आंबेडकर





