The Buddha's
First Sermon – Five Principles
Having decided to preach his
doctrine the Buddha asked himself "to
whom shall I first teach the
doctrine ?"
Then he thought of the five old
companions of his who were with him at Niranjana when he was
practising austerities and who
had left him in anger on his abandonment of austerities.
He asked for their whereabouts.
Having learnt that they were dwelling at Sarnath in the deer
park of Isipatana, he left in
search of them.
After exchange of greetings the
five Pariv-rajakas asked the Buddha whether he still believed
in asceticism. The Buddha
replied in the negative.
He said “there were two
extremes, a life of pleasure and a life of self-mortification.
One says let us eat and drink,
for tomorrow we die. The other says, kill all vasanas (desires). He
rejected both as unbecoming to man.”
He was a believer in the
Madhyama Marga (Majjhima Patipada), the middle path, which is
neither the path of pleasure
nor the path of self-mortification.
On hearing this, the
Parivrajakas became extremely impatient to know what the path was and
requested the Buddha to expound
it to them.
The Buddha agreed.
The Parivrajakas then asked him
: "If the foundation of your Dhamma is the recognition of the
existence of suffering and the
removal of suffering, tell us how does your Dhamma remove
suffering !"
The Buddha then told them that
according to his Dhamma if every person followed
(1) the Path
of Purity ;
(2) the Path
of Righteousness ; and
(3) the Path
of Virtue,
it would bring about the end of all suffering.
And he added that he had
discovered such a Dhamma.
The Parivrajakas then asked the
Buddha to explain to them his Dhamma.
And the Buddha was pleased to
do so.
He addressed them first on the
Path of Purity.
"The Path of Purity,"
he told the Parivrajakas, “ teaches that a person who wishes to be good
must recognise some principles
as principles of life.”
According to my Path of Purity
the principles of life recognised by it are
: Not to
injure or kill
: Not to
steal or appropriate to oneself anything which belongs to another
: Not to
speak untruth
: Not to
indulge in lust
: Not to
indulge in intoxicating drinks.
"The recognition of these
principles, I say, is most essential for every man. For every man must
have a standard by which to
judge whatever he does. And these principles according to my
teachings constitute the
standard.”
"You may ask, ye Parivrajakas ! Why are
these principles worthy of recognition as a standard
of life.”
"The answer to this question you will
find for yourselves, if you ask : "Are these principles
good for the individual ?
" also if you ask : " Do they promote social good ?"
"If your answers to these
questions are in the affirmative then it follows that the principles of
my Path of Purity are worthy of
recognition as forming a true standard of life."
भगवान बुद्ध का पहला प्रवचन – पंचशील
धम्मोपदेश का निश्चय कर
चुकने के अन्तर बुद्ध ने अपने आप से प्रश्न किया कि मैं सर्व प्रथम किसे धम्मोपदेश
दुं ?
तब उन्हे अपने उन पाँच
साथियों का ध्यान आया जो निरंजना नदी के तट पर उनकी सेवा में थे, और जो सिद्धार्थ गौतम के तपस्या और काय-क्लेश का पथ त्याग
देने पर असन्तुष्ट हो उन्हें छोड़ कर चले गये थे ।
उन्होनें उनके ठोर-ठिकाने
का पता लगाया । जब उन्हें पता लगा कि वे वाराणसी (सारनाथ) के इसिपतन के मृगदाय में
रहते है, तो बुद्ध उधर ही चले दिये ।
कुशल-क्षेम की बातचीत हो
चुकने के बाद परिव्राजकों ने बुद्ध से प्रश्न किया -- “क्या आप अब भी तपश्चर्या तथा काय-क्लेश में विश्वास रखते है?”
बुद्ध ने कहा -- दो सिरे की
बातें है, दोनो किनारों की -एक तो काम-भोग का जीवन और
दुसरा काय-क्लेश का जीवन ।
एक का कहना है, खाओ पीयो मौज उडाओ क्योंकि कल तो मरना ही है । दुसरे का
कहना है तमाम वासनाओंका मूलोच्छेद कर दो । उन्होंने दोनों को आदमी की शान के योग्य
नहीं माना ।
वे मध्यम-मार्ग को
मानने वाले थे -- बीच का मार्ग; जो कि न तो कामभोग का मार्ग है और न काय-क्लेश का मार्ग है
।
यह सुना तो परिव्राजक उस
नये-मार्ग को विस्तारपूर्वक जानने के लिये अत्यन्त उत्सुक हो उठे । उन्होंने बुद्ध से प्रार्थना की कि वे उन्हें
बतायें ।
बुद्ध ने स्वीकार किया ।
तब परिव्राजकों ने पूछा:
दु:ख और दु:ख का विनाश ही यदि आप के धम्म की आधार-शिला है तो हमें बताइये कि आप का
धम्म कैसे दु:ख का नाश कर सकता है?"
तब बुद्ध ने उन्हें समझाया
कि उनके धम्म के अनुसार यदि हर आदमी
(१) पवित्रता के पथ पर चले,
(२) धम्म के पथ पर चले,
(३) शील-मार्ग पर चले तो इस दु:ख का एकान्तिक निरोध हो सकता है ।
और उन्होने कहा कि उन्होंने
ऐसे धम्म का आविष्कार कर लिया है ।
परिव्राजकों ने तब बुद्ध से
अपने धम्म की व्याख्या करने की प्रार्थना की ।
बुद्ध ने कृपया इसे स्वीकार
किया ।
उन्होंने सब से पहले उन्हें पवित्रता का पथ ही समझाया ।
उन्होंने परिव्राजकों से
कहा ‘कोई भी आदमी जो अच्छा बनना चाहता है उसके लिये
यह आवश्यक है कि वह कोई अच्छाई का माप-दण्ड स्वीकार करे ।’
“मेरे पवित्रता के पथ के
अनुसार अच्छे जीवन के पांच माप दण्ड है –"
(१) किसी प्राणी की हिंसा न
करना
(२) चोरी न करना अर्थात्
दुसरे की चीज को अपनी न बना लेना,
(३) व्यभिचार न करना,
(४) असत्य न बोलना,
(५) नशीली चीजों का ग्रहण न
करना ।
मैं कहता हूँ कि हर आदमी के
लिये यह परमावश्यक है कि वह इन पाच शीलो को स्वीकार करे । क्योकि हर आदमी के लिये
जीवन का कोई मापदण्ड होना चाहिये, जिससे वह अपनी अच्छाई-बुराई
को माप सके; मेरे धम्म के अनुसार ये
पांच शील जीवन की अच्छाई-बुराई मापने के माप-दण्ड ही है ।
हे परिव्राजको । तुम पूछ
सकते हो कि इन पाँच शीलों को जीवन का माप-दण्ड ही क्यों स्वीकार किया जाय?"
इस प्रश्न को उत्तर तुम्हे
स्वयं ही मिल जायेगा यदि तुम अपने से ही यह प्रश्न पूछो -क्या यह शील व्यक्ति के
लिये कल्याणकारी है? और साथ ही यह भी पूछों,
क्या इन शीलों का पालन करना समाज के लिए कल्याणकारी है?"
यदि इन दोनों प्रश्नों का
तुम्हारा उत्तर स्वीकारात्मक है तो इस से यह सीधा परिणाम निकलता है कि मेरे
पवित्रता के पथ के ये पांच शील इस योग्य है कि उन्हें जीवन का सच्चा माप-दण्ड मान लिया जाय ।
भगवान बुद्धाचे पहिले
प्रवचन – पंचशील
आपल्या धम्माचा उपदेश
करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की, “सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला
देऊ ?”
त्यानंतर त्याने आपल्या
जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्याच्या
बरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते.
त्याने त्यांच्या
ठावठिकाण्याची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की, ते सारनाथला इसिपतनच्या मृगदायवनात राहात आहेत. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला.
परस्परांना अभिवादन करून
कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्राजकांनी भगवान बुद्धाला
विचारले, “तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय?” बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले.
बुद्ध म्हणाला, “जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे.”
“एक म्हणतो, खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो, सर्व वासना मारून टाका.” हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले.
भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते - मज्जिमम पतिपद - मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही.
हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते
परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली.
भगवान बुद्धाने त्यांची
विनंती मान्य केली.
नंतर परिव्राजकांनी
बुद्धाला विचारले, “दु:खाचे अस्तित्व मान्य
करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा .”
भगवान बुद्धाने सांगितले की,
या धम्मानुसार जर प्रत्येकाने
(१) पावित्र्याचा मार्ग अनुसरला,
(२) सदाचरणाचा मार्ग स्वीकारला, आणि
(३) शीलमार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दु:खाचा निरोध
होईल.
आणि त्यांनी सांगितले की
अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे.
परिव्राजकांनी नंतर भगवान
बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली.
भगवान बुद्धाने त्यांची
विनंती आनंदाने मान्य केली.
त्याने पहिल्याप्रथम
त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगतला.
त्याने परिव्राजकांना
सांगितले की, “ज्याला चांगला मनुष्य
होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे
म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत, ही विशुद्धी मार्गाची शिकवण
आहे.”
“माझ्या विशुद्धीच्या
मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत:
(१) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे,
(२) चोरी न करणे अर्थात् दुसर्याच्या मालकीची वस्तु न बळकावणे,
(३) व्यभिचार न करणे,
(४) असत्य न बोलणे,
(५) मादक पेय ग्रहण न करणे.”
“माझे असे म्हणणे आहे की, प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य
करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी
त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू
शकेल. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच पाच तत्वे किंवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप
करण्याचा मापदंड आहे.
“परिव्राजक, तुम्ही विचाराल की, जीवनाचा आदर्श
म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का?”
“या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला
स्वतःलाच सापडेल, जर तुम्ही स्वतःलाच असा
प्रश्न केलात की, ‘ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय?’ किंवा ‘ती सामाजिक हित साधणारी आहेत काय?’”
“जर या प्रश्नाची तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे, जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळविण्यास लायक आहेत, हेच त्यावरून सिद्ध होईल.”
Ref : The Buddha and His Dhamma - Dr. B. R. Ambedkar
संदर्भ : बुद्ध और उनका धम्म - डॉ. भि. रा. अम्बेडकर
