Monday, 10 April 2017

Siddhartha's Marriage | सिद्धार्थ का विवाह | सिद्धार्थ चा विवाह



There was a Sakya by name Dandapani. Yeshodhara was his daughter. She was well
known for her beauty and for her ' sila."
Yeshodhara had reached her sixteenth year and Dandapani was thinking about her
marriage.
According to custom Dandapani sent invitations to young men of all the neighbouring
countries for the Swayamvar of his daughter.
An invitation was also sent to Siddharth Gautama.


दंडपाणि नाम का एक शाक्य था यशोधरा उसकी लड़की थी अपने सौन्दर्य और 'शिल' के लिये वह प्रसिद्ध थी
यशोधरा अपने सोलहवें वर्ष में पहुंच गई थी और दंडपाणि को उसके विवाह की चिन्ता ने घेरा था
प्रथा के अनुसार दंडपाणि ने अपने सभी पडोसी 'देशो' के रूणो को अपनी लड़की के स्वयंवरमें सम्मिलित होने का निमंत्रण भेजा
सिद्धार्थ गौतम के नाम भी एक निमंत्रण भेजा गया था



दंडपाणि नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या
सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती.
यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते दंडपाणि तिच्या लग्नाच्या चिंतेत होता.
त्या वेळच्या  प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली.
सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते.





Siddharth Gautama had completed his sixteenth year. His parents also were equally
anxious to get him married.
They asked him to go to the Swayamvar and offer his hand to Yeshodhara. He agreed to
follow his parents' wishes.


सिद्धार्थ गौतम का भी सोलहवाँ वर्ष पूरा हो चुका था उसके माता-पिता भी उसकी शादी के लिये वैसे ही चिन्तित थे
उन्होंने उसे स्वयंवरमें जाने को और यशोधरा का पाणि-ग्रहणकरने को कहा उसने अपने माता-पिता का कहना माना



सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती.
त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणिग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला.


From amongst the young men Yeshodhara's choice fell on Siddharth Gautama.
Dandapani was not very happy. He felt doubtful about the success of the marriage.
Siddharth, he felt, was addicted to the company of saints and sages. He preferred
loneliness. How could he be a successful householder?
Yeshodhara, who was determined to marry none but Siddharth, asked her father whether
to be in the company of saints and sages was a crime. She did not think it was.
Knowing her daughter's determination to marry no one but Siddharth Gautama, the
mother of Yeshodhara told Dandapani that he must consent. Dandapani did.


आगत तरुणों में से यशोधरा ने सिद्धार्थ-गौतम को ही चुना
दंडपाणि बहुत प्रसन्न नहीं था उसे उन दोनों के दाम्पत्यजीवन की सफलता में सन्देह था
उसे लगता था कि सिद्धार्थ को तो साधु-सन्तो की संगति ही अच्छी लगती है उसे तो एकान्त प्रिय है वह एक अच्छा सद्गृहस्थ कैसे बन सकेगा?
यशोधरा सिद्धार्थ गौतम के अतिरिक्त और किसी दुसरे से विवाह करना चाहती थी उसने अपने पिता से पूछा क्या साधू-सन्तो की संगति को अच्छा समझना कोई अपराध है? यशोधरा का ऐसा ख्याल नहीं था
यशोधरा की मां को जब मालूम कि यशोधरा सिद्धार्थ गौतम के अतिरिक्त और किसी दुसरे से विवाह करना ही नहीं चाहती, उसने दंडपाणि से कहा कि उसे राजी हो जाना चाहिये दंडपाणि राजी हो गया



जमलेल्या सर्व युवकांतून यशाधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले.
दंडपाणि विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता.
त्याला वाटले,सिद्धर्थाला साधुमुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल?’
सिद्धर्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूंच्या तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे?” यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते.
सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमति देण्यास दंडपाणीला सांगतले. दंडपाणीने तशी संमती दिली.




The rivals of Gautama were not only disappointed but felt that they were insulted.
They wanted that in fairness to them Yeshodhara should have applied some test for her
selection. But she did not.
For the time being they kept quiet, believing that Dandapani would not allow Yeshodhara
to choose Siddharth Gautama so that their purpose would be served.
But when Dandapani failed, they made bold and demanded that a test of skill in archery
be prescribed. Dandapani had to agree.


गौतम के प्रतिद्वन्दी निराश ही नहीं हुए बल्कि उन्हें लगता था कि उनका अपमान हो गया है
उन्हें लगता था कि कम से कम उनके प्रति न्यायकरने के लिये ही यशोधरा को चाहिये था कि चुनावकरने से पहले किसी किसी तरह से सबकी परिक्षा लेती
कुछ समय तो वह चुप रहे उनका विश्वास था कि दंडपाणि यशोधरा को गौतम का चुनाव ही करने देगा उनका उद्देश्य युं ही पूरा हो जायेगा
लेकिन जब उन्होंने देखा कि दंडपाणि असफल रहा है, उन्होंने हिम्मत से काम लिया और इस बात की मांग की कि लक्ष्यवेधकी एक परिक्षाहोनी ही चाहिये दंडपाणि को स्वीकार करना पड़ा



गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले.
त्यांना वाटले की, त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केले नाही.
त्या वेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणि यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड रु देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल.
परंतु दंडपाणि जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की,
धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले.



At first Siddharth was not prepared for this. But Channa, his charioteer, pointed out to
him what disgrace his refusal would bring upon his father, upon his family and upon
Yeshodhara.
Siddharth Gautama was greatly impressed by this argument and agreed to take part in the
contest.
The contest began. Each candidate showed his skill in turn.
Gautama's turn came last. But his was the highest marksmanship.



पहले तो सिद्धार्थ इसके लिये तैयार था लेकिन, उसके सारथी, छन्दक ने उसे समझाया कि यदि वह अस्वीकार करेगा तो यह उसके लिये, उसके परिवार के लिये तथा सबसे बढ़कर यशोधरा के लिये ही बड़ी लज्जा की बात होगी
सिद्धार्थ-गौतम के मन पर इस तर्क का बड़ा प्रभाव पड़ा उसने उस परीक्षणमें सम्मिलित होना स्वीकार किया
परिक्षणआरम्भ हुआ प्रत्येक प्रतिद्वन्दी ने अपना-अपना कौशल दिखाया
सबके अन्त में गौतम की बारी थी किन्तु उसी का लक्ष्य-वेधसर्वश्रेष्ठ सिद्ध हुआ



सुरवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल, हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले.
त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले.
स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक  स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले.
गौतमची पाळी सव.च्या शेवटी आली ; परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली.



Thereafter the marriage took place. Both Suddhodana and Dandapani were happy. So was
Yeshodhara and Mahaprajapati.
 After a long term of married life Yeshodhara gave birth to a son. He was named Rahula.


 इसके बाद विवाह हुआ शुद्धोदन और दंडपाणि दोनों को बड़ी प्रसन्नता थी इसी प्रकार यशोधरा और महाप्रजापति भी बड़ी प्रसन्न थी
 विवाह हो चुकने के काफी समय बाद यशोधरा ने एक पुत्र को जन्म दिया उसका नाम राहुल रखा गया



तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन दंडपाणि ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला.
विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले.





Ref   : The Buddha and His Dhamma - Dr. B. R. Ambedkar
संदर्भ : बुद्ध और उनका धम्म - डॉ. भि. रा. अम्बेडकर
संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. भि. रा. आंबेडकर