Monday, 3 April 2017

Siddhartha's Self-interest | सिद्धार्थ का आरम्भिक स्वभाव | सिद्धार्थाची सुरवातीची लक्षणे |



Once he went to his father's farm. During recess he was resting under a tree enjoying the peace and beauty of nature. While so seated a bird fell from the sky just in front of him.
The bird had been shot at by an arrow which had pierced its body and was fluttering about in great agony.

एक बार वह अपने पिता के खेतों पर गया विश्राम के समय वह एक वृक्ष के नीचे लेटा हुआ प्राकृतिक शान्ति और सौन्दर्य का आनन्द लूट रहा था उसी समय आकाश से एक पक्षी ठीक उसी के सामने गिरा
पक्षी को एक तीर लगा था, जिसने उसे बिंध दिया था और जिसके कारण वह तडफडा रहा था

एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांति सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला.
त्या पक्ष्याला बाण लागला होता तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता.





Siddharth rushed to the help of the bird. He removed the arrow, dressed its wound and gave it water to drink. He picked up the bird, came to the place where he was seated and wrapped up the bird in his upper garment and held it next to his chest to give it warmth.

सिद्धार्थ पक्षी की सहायता के लिये उठ बैठा उसने उसका तीर निकाला, जख्म पर पट्टी बांधी और पीने के लिये पानी दिया उसने पक्षी को गोद में लिया और अपनी चादर के भीतर छिपाकर उसे अपनी छाती की गरमी पहूँचाने लगा


सिद्धार्थ त्या पक्ष्याला वाचविण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली  त्याला पिण्यासाठी पाणी दिलेत्याने त्या पक्ष्याला उचलले  ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्ष्याला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळलेआणि ऊब देण्यासाठी  त्याला आपल्या हृदयाशी धरले.






Siddharth was wondering who could have shot this innocent bird. Before long there came his cousin Devadatta armed with all the implements of shooting. He told Siddharth that he had shot a bird flying in the sky, the bird was wounded but it flew some distance and fellsomewhere there, and asked him if he had seen it.
Siddharth replied in the affirmative and showed him the bird which had by that time completely recovered.
Devadatta demanded that the bird be handed over to him. This Siddharth refused to do. A sharp argument ensued between the two.
Devadatta argued that he was the owner of the bird because by the rules of the game, he who kills a game becomes the owner of the game.
Siddharth denied the validity of the rule. He argued that it is only he who protects that has the right to claim ownership. How can he who wants to kill be the owner ?

सिद्धार्थ को आश्चर्य था कि इस असहाय पक्षी को किसने बींधा होगा? शीघ्र ही उसका चचेरा भाई देवदत्त वहाँ पहूँचा वह शिकार के सभी आयुधों के साथ था उसने सिद्धार्थ से कहा कि उसने उडते हुए पक्षी पर तीर चलाया था पक्षी घायल हो गया था कुछ दूर उछलकर वह वही, आस-पास ही गिरा था उसने सिद्धार्थ से पूछा- क्या तुमने उसे देखा है ?”
सिद्धार्थ ने हाँ कहकर स्वीकार किया और वह पक्षी भी उसे दिखाया जो अब बहुत कुछ स्वस्थ हो चला था
देवदत्त ने मांग की कि उसका पक्षी उसे दे दिया जाय सिद्धार्थ ने इनकार किया दोनों में घोर विवाद हुआ
देवदत्त का कहना था कि शिकार के नियमों के अनुसार जो पक्षी को मारता है वही उसका मालिक होता है इसिलये वही उसका मालिक है
सिद्धार्थ का कहना था कि यह आधार ही सर्वथा गलत है जो किसी की रक्षा करता है, वही उसका स्वामी हो सकता है हत्यारा कैसे किसी का स्वामी हो सकता है?

सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की, “या निष्पाप पक्ष्याला कोणी मारले असावे?” थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगतले की, आकाशात उडत असलेल्या एका पक्ष्याला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो थे कुठे तरी पडला असावा. तो तू पाहिलास काय?” सिद्धार्थाला त्याने विचारले.
सिद्धार्थ होय म्हणाला घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला.
देवदत्ताने मागणी केली की, “माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर.” पण सिद्धार्थाने ते नाकारले, त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला.
देवदत्ताचे म्हणणे होते की, “या पक्ष्याचा मालक मी आहे. कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो.”
सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला, जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो ?”








Neither party would yield. The matter was referred to arbitration. The arbitrator upheld the point of view of Siddharth Gautama.
Devadatta became his permanent enemy. But Gautama's spirit of compassion was so great that he preferred to save the life of an innocent bird to securing the goodwill of his cousin.
Such were the traits of character found in the early life of Siddharth Gautama.

दोनों में से एक भी पक्ष झुकने के लिये तैयार था मामला न्यायालय तक जा पहूँचा न्यायालय ने सिद्धार्थ के पक्ष में निर्णय दिया
देवदत्त सिद्धार्थ का बद्ध-वैरी बन गया लेकिन सिद्धार्थ की करुणा ऐसी ही अनुपम थी कि वे चचेरे भाई को प्रसन्न बनाये रखने की बजाय एक पक्षी की जान बचाना अधिक श्रेयस्कर समझते थे
सिद्धार्थ गौतम का आरम्भिक जीवन कुछ-कुछ ऐसा ही था

या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टीकोणच योग्य असल्याचा निर्णय दिला.
यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला; परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की, आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्ष्याचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले.
सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभावलक्षणे ही अशी होती.




Ref   : The Buddha and His Dhamma - Dr. B. R. Ambedkar
संदर्भ : बुद्ध और उनका धम्म - डॉ. भि. रा. अम्बेडकर
संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. भि. रा. आंबेडकर

No comments:

Post a Comment