On the fifth
day the ceremony of name-giving took place. The name chosen for the child was Siddharth.
His clan name was Gautama. Popularly, therefore, he came to be called Siddharth Gautama.
In the midst
of rejoicing over the birth and the naming of the child Mahamaya suddenly fell ill and her illness became
very serious.
पाचवें दिन नामकरण संस्कार किया गया । बालक का नाम सिद्धार्थ रखा गया । उसका गोत्र गौतम था । इसीलीये जनसाधारण मे वह सिद्धार्थ गौतम से प्रसिद्ध हुआ ।
बालक के जन्म की खुशियाँ और उसके नामकरण की विधियाँ अभी समाप्त नही हुई थी कि महामाया अचानक बीमार पड़ी और उसके रोग ने गम्भीर रूप धारण कर लिया ।
पाचव्या दिवशी नामकरणविधि करण्यात आला. मुलाचे नाव ‘सिध्दार्थ’ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते. म्हणून त्याला सिध्दार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले.
मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरणविधी-समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले.
Realising
that her end was near she called Suddhodana and Prajapati to her bedside and said : "
I am sure that the prophecy made by Asita about my son will come true. My regret is that I will not live to see it fulfilled."
" My child will soon be a motherless child. But I am not worried in
the least as to whether after me my child will be carefully nursed, properly looked after and
brought up in a manner befitting his future."
" To you Prajapati, I entrust my child, I have no doubt that you will
be to him more than his mother."
" Now do not be sorry. Permit me to die. God's call has come and His
messengers are waiting to take me." So saying, Mahamaya
breathed her last. Both Suddhodana and Prajapati
were greatly grieved and wept bitterly.
Siddharth was only seven
days old when his mother died.
अपना अन्त समय निकट आया जान उसने शुध्दोदन और प्रजापति को अपनी शय्या के समीप बुलाया और कहा -- “मुझे विश्वास है कि असित ने मेरे बच्चे के बारे में जो भविष्यवाणी की है , वह सच्ची निकलेगी । मुझे यही अफसोस है कि मै इस वाणी को पुरा हुआ न देख सकूंगी ।”
“प्रजापति ! मैं अपना बच्चा तुम्हे सौंप जाती हूँ। मुझे विश्वास है कि उसके लिये तुम उसकी माँ से भी बढ़कर होगी ।”
“मेरा बालक शीघ्र ही मातृ-हीन बालक हो जायेगा । लेकिन मुझे इसकी तनिक चिन्ता नहि है कि मेरेबाद यथायोग्य विधि से उसका लालन-पालन नही होगा ।”
“अब दुखी न हो । मुझे मर ने दे। मेरा अन्त समय आ पहूँचा है । दूत मेरी प्रतीक्षा कर रहे है ।” इतना कहते-कहते महामायाने अन्तिम साँस ले ली । शुध्दोदन और प्रजापति दोनो को ही बड़ा दु:ख हुआ । दोनो फूटफूटकर रोने लगे ।
जब सिद्धार्थ की माता का देहान्त हुआ तो उसकी आयु केवल सात दिन की थी ।
आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोदनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलाविले आणि म्हटले,“माझ्या मुलाबद्दल असितमुनिनं जे भविष्य वर्तविलं आहे ते खरं होईल, याचा मला विश्वास वाटत आहे. मला दु:ख एवढंच वाटतं की, ते खरं ठरलेलं पाहाण्यासाठी मी जीवंत राहणार नाही.”
“माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल ! परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचं काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्यप्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही, याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही.”
“प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही.”
“आता कष्टी होऊ नका. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलावणं आलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत!” असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोदन व प्रजापती या दोघांनाही दु:खावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला.
सिध्दार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा सात दिवसांचा होता.
Siddharth
had a younger brother by name Nanda. He was the son of Suddhodana born to Mahaprajapati.
He had also
several cousins, Mahanama and Anuruddha, sons of his uncle Suklodan, Ananda, son
of his uncle Amitodan, and Devadatta, son of his aunt Amita. Mahanama was older
than Siddharth and Ananda was younger.
Siddharth grew up in their
company.
सिद्धार्थ का एक छोटा भाई भी था । उसका नाम था नन्द । वह शुध्दोदन का महाप्रजापति से उत्पन्न पुत्र था ।
उसके ताया-चाचा की भी कई संतानें थी।महानाम और अनुरुद्ध शुक्लोदन के पुत्र थे तथा आनन्द अमितोदन के। देवदत्त उसकी बुआ अमिता का पुत्र था । महानाम सिद्धार्थ की अपेक्षा बड़ा था और आनन्द छोटा ।
सिद्धार्थ उनके साथ खेलता-खाता बड़ा हुआ ।
सिध्दार्थाचा नन्द नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोदनाचा महाप्रजापति पासून झालेला तो पुत्र होता. सिध्दार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनुरुद्ध त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होत. महानाम हा सिध्दार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता.
त्यांच्या सोबतीत सिध्दार्थ लहानाचा मोठा झाला.
Ref : The Buddha and His Dhamma - Dr. B. R. Ambedkar
संदर्भ : बुद्ध और उनका धम्म - डॉ. भि. रा. अम्बेडकर
संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. भि. रा. आंबेडकर



good info
ReplyDelete